प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०४ - जानेवारी - २०१९

नेवरेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद येथील पोलीस पाटील यांनी त्यांच्या गावातून वाळू वाहतूक करू देण्यासाठी वाळू वाहतुकदारकडे रु. १०,०००/- हफ्ता म्हणून लाचेची मागणी करून त्यापैकी रु. ५०००/- स्वीकारले असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०४ - जानेवारी - २०१९

शेतजमीन खातेफोड करून नवीन ७/१२ देण्याकरिता बीड जिल्यातील सजा वाहिरा ता. आष्टी च्या तलाठी यांनी खाजगी इसमाच्या मदतीने रु. ३०००/- लाच घेतली म्हणून एसीबीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.

०३ - जानेवारी - २०१९

सातबारा पत्रकी नोंद घेऊन त्याची प्रत देण्याकरिता जि. औरंगाबाद, सजा कन्नडच्या तलाठी यांना रु १०,०००/- लाच घेताना एसीबीने रांगेहात पकडले.

०१ - जानेवारी - २०१९

कर्जत नगरपालिकेचे दोन लिपिक मालमत्ता करावरील दंड रक्कम कमी करून देणेसाठी तक्रारदाराकडुन १३५०० रु. ची लाच घेताना एसीबी कडून अटक.

३१ - डिसेंबर - २०१८

तलाठी सज्जा राहाटी, ता. भोकर, जि. नांदेड यांनी फेरफार करून सातबारावर नोंद घेण्यासाठी रु. ४,०००/- लाचेची मागणी करून तडजोडीअंती रु. ३,०००/- लाच मागणी केल्याचे निष्पन्न झालेने त्यांचेविरुद्ध लाच मागणी गुन्हा नोंद.