प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१० - डिसेंबर - २०१८

विक्री झालेल्या जमिनीवर हरकत नोंदवुन घेण्यासाठी व विहिरीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी रु. १५,०००/- ची लाच घेताना एसीबी. ने रंगेहात पकडलेल्या कामगार तलाठी, अकलापूर, ता.-संगमनेर यांच्याविरुद्ध चालू असलेल्या खटल्यात मा. जिल्हा न्यायाधिश-३, व सहा. सत्र न्यायाधिश संगमनेर यांनी त्यांना ५ वर्षे सक्तमजुरी व रु.१०,०००/- दंड शिक्षा सुनावली.

१० - डिसेंबर - २०१८

अन्न व औषध प्रशासन, बांद्रा येथिल अन्न सुरक्षा अधिकारी पाचुपते यांनी हॉटेल परवाना निलंबित नोटीसवर दिलेल्या उत्तरावर सकारात्मक अहवाल संबंधित कार्यालयास पाठविण्यासाठी रु. २०,०००/- लाचेची मागणी करून तडजोडीअंती रु. १५,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०७ - डिसेंबर - २०१८

डोंबिवली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षकाने खाजगी व्यक्तींच्या मदतीने रु.१,००,०००/- लाच घेतली म्हणून त्यांच्याविरुद्ध ऐसीबीतर्फे गुन्हा नोंद करण्यात आला.

०६ - डिसेंबर - २०१८

प्लॉटचा फेर मंजुर करून ८ अ चा उतारा देण्यासाठी भिकार सारोळा ग्रामपंचायत ता. उस्मानाबाद जि. औरंगाबादच्या ग्रामसेवक यांनि रु. १०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०६ - डिसेंबर - २०१८

रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता व उप अभियंता यांनी ग्रामपंचायत हद्दीतील पाखाडी कामाचे बिल मंजूर करण्याकरिता रु. ५०००/- लाच घेतली असता त्यांना एसीबीने रंगेहात पकडले.