प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२९ - डिसेंबर - २०१८

मुंबई नाका पोलीस ठाणे, नाशिक शहर येथिल सहाय्य्क पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाणेस प्राप्त तक्रार अर्जावर कारवाई न करणेकरीता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झालेने त्यांचेविरुद्ध एसीबीतर्फे लाच मागणी गुन्हा नोंद.

२९ - डिसेंबर - २०१८

अपघात प्रकरणात कारवाई न करता प्रकरण मिटवण्यासाठी घारगाव पोलीस ठाणे, जि. अहमदनगर येथिल पोलीस हवालदार यांनी रु. ८,०००/- लाचेची मागणी करून त्यापैकी रु. ४,०००/- लाच रक्कम स्विकारली म्हणुन एसीबीतर्फे गुन्हा नोंद.

२९ - डिसेंबर - २०१८

तलाठी सज्जा हरडफ, ता. हदगाव, जि. नांदेड यांनी वारसा हक्काने जमीनीचे फेरफार करून देण्यासाठी रु. ४,५००/- लाचेची मागणी करून ती स्विकारली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

२८ - डिसेंबर - २०१८

मानेरे चिंचपाडा येथिल अनधिकृत बांधलेल्या चाळींवर कारवाई न करण्यासाठी प्रभागक्षेत्र अधिकारी, आय वॉर्ड, क.डों.म.पा. यांनी रु. ८०,०००/- लाचेची मागणी करून त्यापैकी रु. २५,०००/- पहिला हफ्ता म्हणुन घेतले असता एसीबी ने त्यांना रंगेहात पकडले.

२७ - डिसेंबर - २०१८

खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करण्यासाठी कर्जत, जि.रायगड येथील तलाठी यांनी रु. ५,०००/- लाच घेतली असता ऐसीबी त्यांना रंगेहात पकडले.