प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०६ - जुलै - २०१८

उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय नांदेड येथील कर्मचारी सुरेश संभाजी निलेवार यांनी ४,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

०५ - जुलै - २०१८

लोकसेवक एस.एस. केंद्रे, भुकरमापक वर्ग - ३, भूमी अभिलेख कार्यालय पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांनी ८,०००/- रुपयांची लाच मागणी केलेवरून अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा नोंद

०४ - जुलै - २०१८

डॉक्टर संजय नेमीचंद खंडागळे जिल्हा कारागृह वैद्यकीय अधिकारी वर्ग -२, अहमदनगर यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याने अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अकोले पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल

०३ - जुलै - २०१८

रामहरी दादाराव माने वय ४२ वर्षे व्यवसाय तालाठी सज्जा सिंदगाव, तालुका- तुळजापूर, जिल्हा- उस्मानाबाद यांनी ७/१२ उतारा देण्यासाठी १,०००/- रुपयाची लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

३० - जून - २०१८

महावितरण मुंब्रा उपविभाग, मुंब्रा येथील कार्यकारी अभियंता धनंजय वसंतराव भोजने वय ५२ वर्षे यांनी २०,०००/- रुपयाची लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .