आमच्या विषयी


  1. १९४६ : मुंबई व मुफसल (उपनगर) क्षेत्रासाठी लाचलुचपत प्रतिबंधक शाखा प्रस्थापित करण्यात आल्या.
  2. १९५३ : मुंबई व मुफसल (उपनगर) क्षेत्रातील शाखांचे एकत्रीकरण करण्यात आले.
  3. १९५७ : लाचलुचपत प्रतिबंधक आणि गुप्तवार्ता केंद्र, बेलार्ड पिअर, मुंबई येथे स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आले होते. कार्यालयाची जागा भाडेतत्वावर घेण्यात आली होती.
  4. १९९२ : केंद्राचे कार्यालय बेलार्ड पिअर मुंबई येथून मधु इंडस्ट्रिअल ईस्टेट, वरळी, मुंबई येथे स्थलांतरित करण्यात आले. त्यावेळी या केंद्राचे नाव ‘‘ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ’’ असे करण्यात आले.
  5. २०११ : दिनांक १ जून २०११ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय मधु इंडस्ट्रिअल इस्टेट, वरळी येथुन स्थलांतरीत होऊन आपल्या स्वतःच्या स्वतंत्र इमारतीत म्हणजेच सर पोचखनवाला रोड, वरळी, मुंबई येथे आले आहे.
    दूरदृष्टी
    • भ्रष्टाचारमुक्त राष्ट्राचे ध्येय साध्य करताना शासकीय यंत्रणेद्वारे आणि समाजाद्वारे भ्रष्टाचारा विरोधी प्रबळ संस्कृती निर्माण करणे आणि एकात्मता व पारदर्शकता टिकवून ठेवणे.

    ध्येय
    • उच्च दर्जाच्या व्यावसायिकतेचे, निःपक्षपातीपणाचे आणि कर्तव्यपरायणतेचे प्रदर्शन करून भ्रष्टाचारविरोधी कायद्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीद्वारे भ्रष्टाचारविरूद्ध कठोरपणे संघर्ष करणे, नियंत्रण करणे व भ्रष्टाचारास प्रतिबंध करणे.

    धोरण
    • शिक्षण व जागरूकता मोहिमांद्वारे भ्रष्टाचारास प्रतिबंध करणे. तक्रारींची योग्य चौकशीकरुन भ्रष्ट कर्मचाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईद्वारे भ्रष्टचाराविरूद्ध लढा देणे आणि अटकाव करणे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे, गुन्हेगारी गैरवर्तन, बेहिशोबी मालमत्ता इ. ची संपुर्ण चौकशी करणे आणि भ्रष्ट लोकसेवकांविरूद्ध परिणामकारक खटला चालवणे.