प्रसिद्धी पत्रक

१४ - नोव्हेंबर - २०१८
शेतीच्या सात बारा उताऱ्यावरील नाव कमी करण्याकरीताची नोंद मंजुर करण्यासाठी जि. अहमदनगर, कोपरगाव, हिंगणीच्या मंडळ अधिकारी यांचे सांगण्यावरून रु. ४,०००/- लाचेची रक्कम खाजगी इसमाने स्विकारली असता एसीबीने रंगेहात पकडले.

१४ - नोव्हेंबर - २०१८
फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्याकरीता मुंबईनाका पो. ठाणे, नाशिक शहरच्या पोलीस शिपाई याने रु. १५,०००/- लाचेची मागणी करून तडजोडीअंती रु. ५,०००/- लाच घेतली असता एसीबीने रंगेहात पकडले.

१४ - नोव्हेंबर - २०१८
वसई येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या सर्वेक्षण अधिकारी यांनी बेकायदेशीर बांधकाम असलेल्या गाळ्यांना निष्कासित न करण्यासाठी रु. २५,०००/- लाच घेतली असता एसीबीने रंगेहात पकडले.

१३ - नोव्हेंबर - २०१८
पोलीस ठाणे सातारा, औरंगाबाद येथे नेमणुकीस असलेले सहायक फ़ौजदार यांनी तक्रारदार यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रार अर्जावरून त्यांचे वरिष्ठ मा. समादेशक यांना तसा अहवाल सादर न करण्यासाठी रु. २०,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०६ - नोव्हेंबर - २०१८
तळेगाव, ढमढेरे , ता. शिरूर, जि. पुणे येथील पशु वैदयकीय दवाखान्यातील लोकसेवक परिचराणे मृत्यू झालेल्या गाईचे पोस्टमॉर्टेम करून अहवाल देण्यासाठी रु. २,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.