प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०४ - डिसेंबर - २०१८

जमिनीच्या दस्ताची नोंद घेण्याकरिता उस्मानाबादच्या , कलंब दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दुय्यम निबंधकास रु. ४५००/- लाच घेताना एसीबीने रांगेहात पकडले.

०४ - डिसेंबर - २०१८

आठ नंबर रजिस्टर ला नोंद घेऊन त्याचा उतारा देण्याकरिता नांदेड येथील ता. देगलूर, बेंबरा गावच्या ग्रामसेवकाने रु. १४,०००/- लाच घेतली असता त्यांना एसीबीने रांगेहात पकडले.

०४ - डिसेंबर - २०१८

गाळ्यांना विद्युत पुरवठा देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता नाशिक, सिन्नर नगरपालिकेच्या महा व्यवस्थापक यांनी रु. ४२००/- लाच मागितली म्हणून त्यांच्याविरुद्ध एसीबीने लाच मागणी गुन्हा नोंद केला.

०४ - डिसेंबर - २०१८

मुव्ही एडिटिंगचा व्यवसाय असणाऱ्या व्यवसायिकाला ती जागा कमर्शिअल कामकरिताची जागा नसल्याचे सांगून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई न करण्याकरिता वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई च्या पोलीस शिपाई व पोलीस नाईक यांनी लाचेची मागणी केली म्हणून त्यांचे विरुद्ध ऐसीबीतर्फे लाच मागणी गुन्हा नोंद केला.

०४ - डिसेंबर - २०१८

सातबारा पत्रकी नोंद घेण्याकरिता तलाठी कार्यालय शिवणी, ता. हवेली जि. पुणे च्या कोतवाल याना रु १५,०००/- लाच घेताना एसीबीने रांगेहात पकडले.