प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१९ - जानेवारी - २०१९

नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागातील कार्यकारी अभियंता राजेंद्र शंकर सोनवणे यांनी मंजूर इ निविदेच्या कार्यारंभ आदेशा करिता रुपये ०१ लाखाची लाच स्वीकारल्याने मुंबई ला. प्र. वि. कडून गुन्हा दाखल .....

१७ - जानेवारी - २०१९

नांदेड शहर येथे कार्यरत पोलीस उप अधीक्षक कार्यालय पोलीस कॉन्स्टेबलने एका चौकशी प्रकरणात चालू असलेल्या महिलेच्या बाजूने अहवाल सादर करणेकरीता रु. ३०,०००/- लाचेची मागणी केली म्हणून त्यांच्याविरुद्ध एसीबीतर्फे लाच मागणी गुन्हा नोंद करण्यात आला.

१६ - जानेवारी - २०१९

मालेगाव पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक यांना रु. १०,०००/- लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

१२ - जानेवारी - २०१९

शामराव शेटे प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी मुंबई यांनी त्यांचे पदाचा दूरपयोग करून त्यांचे ज्ञात स्रोतापेक्षा ७०. ९१% इतकी अधिक अपसंपत्ती जमा केली म्हणून त्यांचेविरुद्ध व त्यांचे पत्नी विरुद्ध एसीबीतर्फे गुन्हा नोंद करण्यात आला.

११ - जानेवारी - २०१९

वनपाल, वन परिक्षेत्र कार्यालय इस्लापूर, ता. किनवट, जि. नांदेड यांनी वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसान भरपाईचे बिल मंजूर करण्यासाठी रु. ६,०००/- लाच घेतली असता ऐसीबी त्यांना रंगेहात पकडले.