प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२७ - डिसेंबर - २०१८

खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करण्यासाठी कर्जत, जि.रायगड येथील तलाठी यांनी रु. ५,०००/- लाच घेतली असता ऐसीबी त्यांना रंगेहात पकडले.

१९ - डिसेंबर - २०१८

रेशीम उद्योगासाठी लागवड केलेल्या तुतीचे व कीटक पालनासाठी उभारलेल्या शेडचे अनुदान मिळण्यासाठी फाईल मंजूर करण्यासाठी बीड रेशीम कार्यालयाच्या क्षेत्र सहायक अधिकारी यांनी रु. ८०००/- लाचेची मागणी केली म्हणून त्यांचे विरुद्ध लाच मागणी गुन्हा नोंद करण्यात आला.

१९ - डिसेंबर - २०१८

वीजचोरी दंडाची आकारणी कमी करण्याकरिता औरंगाबाद महावितरण कंपनीच्या अति. कार्यकारी अभियंता भरारी पथकाच्या अधिकाऱ्याने रुपये २०,०००/- लाचेची मागणी केली म्हणून त्यांचे विरुद्ध लाच मागणी गुन्हा नोंद करण्यात आला.

१९ - डिसेंबर - २०१८

वन परिक्षेत्र कार्यालय आष्टी येथील वन रक्षक यांनी लाकूड वाहतुकीचा ट्रॅक्टर चालू ठेवण्यासाठी रु . १५००/- लाचेची मागणी करून स्विकारले असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

१७ - डिसेंबर - २०१८

प्रॉक्लमेशन वॉरंटची बजावणी करू नये म्हणून चित्तरंजन पार्क, पोलीस स्टेशन, सेंट्रल प्रोसेसिंग सर्विस पूल नवी दिल्ली येथील सहा. पोलीस उप निरीक्षक यांनी रु. २५,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.