प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१३ - डिसेंबर - २०१८

सिटी सर्वे क्रमांकाचे टिपण, टोच नकाशा व चौकशी उताऱ्याची नक्कल देण्यासाठी उप अधीक्षक भूमी कार्यालय, कळंब येथिल अभिलेखपाल कवडे व शिपाई वाघमारे यांनी २०० रु. लाचेची मागणी करून लोकसेवक वाघमारे यांनी ती स्विकारली असता एसीबी ने त्यांना रंगेहात पकडले.

१३ - डिसेंबर - २०१८

वडीलोपार्जित प्राप्त जमिनीच्या नोंदी मंजूर करून त्या नोंदी ७/१२ उताऱ्यावर घेण्याकरीता थेऊर, पुणे येथील मंडल अधिकारी यांनी खाजगी इसमामार्फत रु. १५,०००/- लाचेची रक्कम स्विकारली असता एसीबी ने त्यांना रंगेहात पकडले.

१२ - डिसेंबर - २०१८

ड्रायव्हींग लायसन्स सस्पेंड न करण्यासाठी चतुर्श्रुंगी वाहतुक विभाग, पुणे शहर येथिल पोलीस नाईक रासकर यांनी रु. ४००/- लाच स्वीकारली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

११ - डिसेंबर - २०१८

कल्याण डोंबिविली महानगरपालिका येथील आरोग्य निरीक्षकाने नोकरी मध्ये कायम करण्याकरीता मूल्यमापन अहवालावर शेरा लिहीण्यासाठी तसेच इच्छित ठिकाणी ड्युटी देणे व हजेरी नोंदविण्यासाठी रु. १०,०००/- लाचेची मागणी करून पहिला हफ्ता म्हणून रु. ५,०००/- स्विकारले असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

११ - डिसेंबर - २०१८

खरेदी केलेल्या जमिनीची फेरफारची नोंद फेरफार रजिस्टरला घेण्यासाठी तलाठी सजा रहिमाबाद, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद येथील तलाठी यांनी रु. १,५००/- लाचेची मागणी करून स्विकारली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.