प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२९ - नोव्हेंबर - २०१८

घुलेवाडी संगमनेर येथिल आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहास पाणी टँकर पूरवठा कामाचे बिल मंजूर करवून दिल्याबद्दल वसतिगृहाच्या गृहपाल यांनी त्याचा मोबदला म्हणून पूरवठादाराकडे रु. ६५,०००/- लाच मागितली असता त्यापैकी रु. ३०,०००/- लाच घेताना त्यांना एसीबीने सापळा कारवाईत रंगेहात पकडले.

२९ - नोव्हेंबर - २०१८

शेती फेरफारची नक्कल करून देण्यासाठी परभणी, केसापूर, ता. बीड येथील तलाठी यांनी रु. २,०००/- लाचेची मागणी केली व तडजोडअंती रु. १,०००/- लाच खाजगी इसमाच्या मदतीने स्विकारली असता एसीबीने त्यास रंगेहात पकडले.

२९ - नोव्हेंबर - २०१८

दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी कासा पोलीस ठाणे, जि. पालघरच्या पोलीस उप निरीक्षक अधिकाऱ्याने रु. २,००,०००/- लाचेची मागणी करून त्यापैकी रु. ७५,०००/- पहिला हफ्ता म्हणून घेतले असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

२८ - नोव्हेंबर - २०१८

शेतीसाठी वीज कनेक्शन देण्यासाठी रत्नागिरी येथिल महावितरण कंपनी, शाखा खोपीच्या शाखा अभियंत्याने रु. २५,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

२८ - नोव्हेंबर - २०१८

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि. प. ठाणे या कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता प्रज्वल भोईर यांनी त्यांच्या सेवाकालात उत्पन्न स्त्रोतापेक्षा अधिक १६. २५ % अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याने एसीबीतर्फे त्यांचेविरुद्ध अपसंपदा गुन्हा नोंद करण्यात आला.