प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२८ - नोव्हेंबर - २०१८

अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याकरीता अंबरनाथ नगर परिषदेच्या कनिष्ठ लिपीकाने रु. २०,०००/- लाचेची मागणी करून त्यापैकी रु. ५,०००/- पहिला हफ्ता म्हणून लाच घेण्याचे कबुल केले म्हणुन एसीबीतर्फे त्यांचेविरोधात गुन्हा नोंद.

२८ - नोव्हेंबर - २०१८

नाशिक शहरच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वरिष्ठ लिपीकाने विभागीय चौकशीचे कामात तक्रारदाराच्या बाजूने मदत करण्याकरीता रु. १५,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

२७ - नोव्हेंबर - २०१८

कल्याण, नेतीवली महावितरण कार्यालयाच्या विद्युत सहायक अधिकारी यांनी विद्युत कनेक्शन लावून देण्याकरिता रु. ४०००/- लाच घेतली असता त्यांना एसीबीने रंगेहात पकडले.

२२ - नोव्हेंबर - २०१८

पोलीस ठाणे शिवाजी नगर, नांदेड येथील सपोनि. व पोलीस हवालदार यांनी तक्रारदार यांचे भावाविरुद्ध दाखल गुन्ह्यात सहाय्य करण्यासाठी लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबी तर्फे गुन्हा दाखल.

२२ - नोव्हेंबर - २०१८

शेत जमिनीबाबतचा फेरफार रद्द करण्याचा निकाल देण्यासाठी भिवंडी उपविभागीय दंडाधीकारी कार्यालयाच्या स्टेनोने रु. १४ लाख लाच घेतली असता एसीबीने त्यांना रांगेहात पकडले.